Sunday, November 27, 2022

न्याय, नीतीने धन अर्जित करावे..

- Advertisement -

प्रवचन सारांश – 13.10.2022

- Advertisement -

‘मार्गानुसारी का प्रथम लक्षण ‘न्याय संपन्न वैभव !’ जैन व श्रावक होने के नाते जो धन कमाते हो, वो न्याय नीतीसे ही अर्जित करना चाहिये…’ धन कमावणे हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे परंतु हे धन न्याय व नीतीने कमवावे असे आवाहन आजच्या प्रवचनात करण्यात आले. डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी ‘लक्ष्मी आवे या …’ या ओळीचे ‘मेरी भावना’ या प्रवचन मालेतील आजच्या प्रवचनात विश्लेषण केले. तर  आगम शास्त्र प्रवचन मालेत पू.  जयधुरंदर मुनी यांनी ‘गुरुंच्या इंगित इशाऱ्याला शिष्याने समजले पाहिजे…’  याबाबत प्रवचन केले. स्वाध्याय भवन येथे जय गच्छाधिपति 12 वे पट्टधर आचार्य श्री पार्श्वचंद्र जी म.सा.  डॉ. पदमचंद्रजी म.सा आदीठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यात दैनंदिन प्रवचन मालेचा लाभ शहरातील असंख्य श्रावक-श्राविका घेत असतात.

- Advertisement -

- Advertisement -

पू. जयपुरंदर मुनी यांनी ‘मेरी भावना’ या आजच्या प्रवचना ‘लक्ष्मी यावे या जावे…’ या ओळीचे विश्लेषण केले. शॉर्टकटने, अनितीने, अन्यायाने धन कमी वेळेत कमावता येते परंतु नैतिकपणे तसे धन सुख देणारे नसते. त्याबाबत उदाहरण देतांना एरंड आणि वटवृक्ष यांचे उदाहरण दिले गेले. एरंड कोठे ही उगवतात. कोठेही ते फोफावतात. अल्पावधीत ते त्याचे वृक्षात रूपांतर होते. एरंडाच्या मुळा कमजोर असतात, त्यामुळे एरंडाचे झाड लवकर कोलमडतात. वटवृक्षाच्या मुळा जमिनीत खोलवर असतात, घट्ट असतात त्यामुळे वटवृक्ष उगवताना त्याचा विस्तार होताना अवधी लागतो. वटवृक्षाची छाया घनदाट असते, त्याच्या मुळा जमिनीला घट्टपणे धरुन ठेवतात त्यामुळे त्याचा उन्मळून पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. धनाचे देखील तसेच असते, अनिती न्याय याने कमावलेले धन एरंडाच्या वृक्षाप्रमाणे असते. आपण जीवन जगण्याचा नेमका उद्देश ठरविला पाहिजे. आपल्याला फक्त ‘धन’ हवे की ‘सुख’ हवे याबद्दल नेमके ठरविले पाहिजे. नीती व न्यायाने धन कमवावे असा मोलाचा संदेश आजच्या प्रवचनात देण्यात आला.

पू. जयधुरंदरमुनी यांच्या आजच्या प्रवचनात गुरुंच्या इंगित इशाराला समजतो तो खरा विनीत असतो यावर चर्चा करण्यात आली.  ही बाब स्पष्ट होण्यासाठी त्यांनी भोलाराम व वैद्य यांची रंजक कथा सांगितली. समाजामध्ये काही व्यक्ती भोलाराम सारखे असतात जे आपल्या बुद्धिचा वापर सद्सद्विवेकाने करत नाहीत.  एका वैद्याकडे भोलाराम नावाचा हरकाम्या असतो. वैद्य व भोलाराम एका रुग्णाला बघण्यासाठी, त्यावर इलाज करण्यासाठी घोड्यावर बसून एके ठिकाणी जात असतात.  वाटेत औषधीची पेटीत पडते ते  भोलाराम पाहतो परंतु उचलत मात्र नाही. थोड्यावेळाने वैद्य यांना पेटी पडल्याला भास होतो ते भोलारामला विचारतात, ‘अरे, भोलाराम आपली औषधांची पेटी खाली पडली का?’ त्यावर तो म्हणाला, ‘हो पडली…’ त्यावर वैद्य म्हणाले खाली पडलेली वस्तू उचलायची असते असे लक्षात ठेव… थोडे अंतर पुढे गेल्यावर घोड्याने लीद खाली टाकली… खाली पडलेली गोष्ट उचलावी असे सांगितले म्हणून भोलारामने लीद देखील उचलली. त्याने आपला बुद्धी, विवेक वापरला नाही. भोलाराम वैतागला, काय उचलावे आणि काय उचलू नये याबाबत मनात गोंधळ आहे मला यादीच बनवून द्या… वैद्य बुवांनी काय उचलावे व काय उचलू नये यांची यादी बनवून दिली. थोड्या अंतराने खुद्द वैद्य घोड्यावरून खाली पडले. जीवाचा आकांत करत वैद्य भोलारामला उचलायला सांगत आहेत, भोलाराम मात्र त्यावेळी वैद्य यांना उचलावे की नाही याचे यादीत शोधत होता. वैद्यांचे नाव नव्हते म्हणून भोलारामने वैद्यांना काही उचलले नाही असे काय कामाचे. गुरुंच्या इंगित इशारा जो समजू शकतो तो खरा विनीत असे यावरून प्रवचनात सांगितले गेले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या