Sunday, November 27, 2022

रसनेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक

- Advertisement -

प्रवचन सारांश – 15.09. 2022

- Advertisement -

रसनेवर नियंत्रण ठेवले तर राग, द्वेष यापासून मानव स्वतःचा बचाव करू शकतो. याविषयी आगम शास्त्रांचे संदर्भ देत अत्यंत सोप्या, प्रभावी प्रवचनातून श्रावक-श्राविकांना समजावून सांगितले.

- Advertisement -

- Advertisement -

‘चरम चक्षू’, ‘आत्म चक्षू’ तिसरा चक्षू ‘विवेक चक्षू’ असे तीन प्रकारचे डोळे असतात. त्याच प्रमाणे या विरुद्ध ४ प्रकारचे अंध ही असतात. ‘क्रोधअंध’, ‘लोभअंध’, ‘मोहअंध’ आणि “काम अंध’ या मुळे मनुष्याचे विवेक चक्षु बंद होऊन अनर्थ निर्माण होतात, ‘मेरी भावना’ या रचनेत ‘नही किसी पर क्रोध करूं’ ह्या बाबीचे चिंतन करावे असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी त्यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर म.सा. यांनी प्रवचनात केले.

क्रोधामुळे नुकसान होत असते. जे प्रेमाने होते ते काम क्रोधाने होत नाही. छोट्या छोट्या कारणांमुळे क्रोध करून वैर भाव निर्माण होत असतो अथवा वैरभाव केला जातो. एकदा का वैर गाठ पडली तर ती पुन्हा सुटत नाही. घरामध्ये सासू-सुनेचे भांडण होत असतात. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातात. बोलातून बोल वाढतात व घरात क्रोध  कलह होत असतो. याऊलट काही घरात सून व सासू यांच्यात विवेक असतो तर त्यामुळे अजिबात क्रोध उत्पन्न होत नाही. या विषयी दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे आपल्या प्रवचनातून दिले गेले. विवेकचक्षु जागृत ठेवले पाहिजे असा मोलाचा संदेश ही जयपुरंदर म.सा. यांनी दिला.

जयगच्छाधिपती आचार्य श्री पू. पार्श्वचंद्र म.सा. आदिठाना ७ यांच्या पवित्र सान्निध्यात स्वाध्याय भवन येथे चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यात ‘मेरी भावना’ व ‘आगम गाथा’  या विषयांवर प्रवचन मालिका सुरू आहे. आगम शास्त्र प्रवचन मालेमध्ये डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयधुरंधर मुनी यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की; कर्मबंध क्षय करायचे असतील तर तप हा उत्तम उपाय आगमशास्त्रात सांगण्यात आला आहे. उपवास, उणोदरी, रस परित्याग करणे आवश्यक असल्याचे आपल्या प्रवचनात सांगितले. रसनेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. रस ग्रहण केल्याने राग, द्वेष भाव शरीरात किंवा मनात येतात याबाबत चिंतन करण्यात आले.

आपल्या शरीरातही पंच रस असतात त्यात  गोड, आंबट, तुरट, खारट व तिखट यांचा समावेश शरीरात आधीच असतो. भेंडी, पालक, भोपळा, हिरवे बीन, कारले या पाच प्रकारच्या हिरव्या भाज्या खाण्याची सवलत आगममध्ये देण्यात आलेली आहे. ह्या भाज्यांचे सेवन केल्याने भाज्यांच्या औषधी गुणधर्मामुळे शरीराला लाभ होतात. या बाबतची महत्त्वाची गोष्ट प्रवचनात सांगितली. रसना म्हणजे जिभेवर नियंत्रण ठेवले तर पुढचे सर्व अनर्थ टळतात त्यामुळे रसनेवर नियंत्रण ठेवा असा मोलाचा संदेश या प्रवचनातून देण्यात आला.

१७ सप्टेंबर पासून ‘११ गणधर की साधना’ हा धार्मिक उपक्रम सुरू होणार असून त्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या