Sunday, November 27, 2022

अहंकारामुळे ‘पतन’ होते; अहंकार सोडवा !

- Advertisement -

प्रवचन सारांश – 12/09/2022

- Advertisement -

अहंकारामुळे पतन झालेले अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत, हा अहंकार प्रत्येकाने सोडून द्यावा असे आवाहन पू. जयपुरंदर म.सा. यांनी प्रवचनातून केले.

- Advertisement -

- Advertisement -

जीवाचे कर्म आत्म्याला भोगावे लागतात. अहंकार आला की पतन सुरू होते. हे स्पष्ट करण्यासाठी प्रवचनात रूपक कथा सांगितली गेली. जंगलात बांबू व गवत असतात. उंच, ताकदवान बांबू अहंकाराने फुललेला असतो. ‘बांबू’ व ‘गवत’ यांचा संवाद होतो. ‘मी उंच, शक्तीशाली आहे तू पण माझ्या सारखे हो.’ असे बांबू गवताला म्हणाला. एकदा मोठे वादळ आले. गवत शिल्लक राहिले बांबू मात्र मोडून पडले. जीवनात कोणतीही परिस्थिती येवो सतत विनम्र असावे. व्यक्ती अहंकाराने फुलू शकते पण ती व्यक्ती फळू शकत नाही. अहंकार में तीनों गए धन वैभव और वंश न मानो तो देख लो रावण, कौरव, कंस. इतिहासाचे पाने चाळली असता. रावण, कौरव आणि कंस यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले तर आपल्या ध्यानात येते, त्यामुळे अहंकार मुळीच बाळगू नये.

‘मद’ व ‘मद्य’ हे जवळपास सारखेच शब्द आहेत. माझ्यामुळे सगळे व्यवस्थित आहे असा अहंकार कुटुंबातील प्रमुख व्यक्तीमध्ये असतो. खरी गोष्ट ही आहे की त्या कुटुंब प्रमुखाच्या मृत्यू नंतर ही इतरांचे, कुटुंबाचे व्यवस्थित चालते. आपण ‘इगो’ ला ‘शो’ नव्हे ‘गो’ करायला हवे. इगो सोडला तर आपण पतनापासून वाचू शकू. भरत चक्रवर्ती राजाने ६ खंड जिंकले. ते वृषभकुट पर्वतावर असलेल्या शिलेवर आपले नाव लिहायचे अशी इच्छा व्यक्त केली. नाव लिहायला गेले परंतु आधीच संपूर्ण शिला नावांनी भरलेली होती. नवीन नाव लिहायला जागाच शिल्लक नव्हती. या पूर्वीच्या कुण्या इसमाचे नाव खोडून आपण आपले नाव लिहावे असेही क्षणभर भरत राजाला वाटले. परंतु आपल्यापेक्षा दिग्गज व्यक्ती होऊन गेले आपल्या नंतर येणाऱ्या व्यक्ती आपले नाव पुसून टाकू शकतात.

आपण अहंकार मुळीच बाळगू नये हा साक्षात्कार त्यांना या प्रसंगातून झाला. अहंकाराला खतपाणी खालणारे ८ प्रकारले मद असतात. मी अमुक उच्च ‘जाती’ मध्ये जन्मलो व अमुक उच्च ‘कुळामध्ये’ जन्मलो हा मद व्यक्तीमध्ये असतो. तो मद आपल्यात येऊ नये. व्यक्तीतला तिसरा मद हा ‘बल’ आहे. आपण बलशाली आहोत हा अहंकार मानवाने कधीच बाळगू नये. कितीही बलवान असो अहंकार बाळगू नये. शेवटी त्या देहाची राख होणार आहे हे ध्यानात ठेवा व अहंकारापासून आपला बचाव करावा असा मोलाचा संदेश आजच्या प्रवचनात डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयपुरंदर म.सा. यांनी दिला.

जयगच्छाधिपती १२ वे पट्टधर आचार्यश्री पार्श्वचंद्रजी म.सा. आदिठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात जळगाव येथील स्वाध्याय भवनात चातुर्मास सुरू आहे. त्यात प्रवचन श्रृंखला सुरु आहे.

विपत्ती ‘पर’ के कारण आती है। दुधात लिंबूचा एक थेंब पडला तर दूध खराब होते. विषय 23 व विकार यांची संख्या 240 आहे. कुणावर ‘राग’, ‘द्वेष’ ही भावना ठेवली तर विकारग्रस्त होते. पंचेंद्रीय मधील शेवटचे इंद्रीय पॉवरफुल असते. एक ऐका इंद्रियावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. राग व द्वेष यामुळे अधिक कर्मबंध होतात. राग व द्वेष भाव ठेऊ नये असे आवाहन डॉ. पद्मचंद्र मुनी यांचे सुशिष्य पूज्य जयधुरंधर मुनी यांनी ‘आगम प्रवचन’ श्रृंखलेत आपल्या प्रवचनात सांगितले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या