स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज पत्रकार परिषद

0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज पत्रकार परिषद

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकारांशी साधणार संवाद

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून आज महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे सोमवारी दि. १५ डिसेंबर २०२५ दुपारी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आयोगाची भूमिका, पुढील प्रक्रिया, निवडणूक कार्यक्रमासंदर्भातील माहिती तसेच विविध प्रश्नांवर स्पष्टीकरण दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद राजकीय व प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.