Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»उताऱ्यावर फेरफार करत दीड लाखाचे कर्ज मंजूर
    जळगाव जिल्हा

    उताऱ्यावर फेरफार करत दीड लाखाचे कर्ज मंजूर

    कर्जदार मयत, दहिगाव ग्रामपंचायत लिपिकाचा प्रताप : गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 30, 2026No Comments260 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

    दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कथितपणे खोटा घरउतारा देऊन महेंद्र फायनान्स कंपनीकडून दीड लाख रुपयांचे कर्ज मिळवून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

    तक्रारदार हेमराज प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत घर क्रमांक 1012/1 या घरउताऱ्यावर स्वतःचे आणि भाऊ दिगंबर प्रभाकर पाटील यांचे संयुक्त नाव असताना, सन 2017 मध्ये त्यांच्या नावाची नोंद कमी करून केवळ दिगंबर पाटील यांच्या नावाचा घरउतारा देण्यात आला. हा उतारा तत्कालीन ग्रामसेवक मच्छिंद्र गंगाराम पाटील व रवींद्र शिवाजी पाटील यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    तक्रारीनुसार, त्या वेळी रवींद्र पाटील हे लिपिक नसून शिपाई पदावर कार्यरत होते. असे असतानाही त्यांनी लिपिकाच्या पदनामावर सही करून संबंधितांना उतारा दिला. या उताऱ्याच्या आधारे महेंद्र फायनान्स कंपनीकडून दिगंबर पाटील यांच्या नावावर सुमारे दीड लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हेमराज पाटील यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या संमतीशिवाय व त्यांची फसवणूक करून हा उतारा देण्यात आला. तसेच आर्थिक लाभाच्या उद्देशाने विश्वासघात करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

    याच प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महेंद्र फायनान्स कंपनीने सध्याचे ग्रामपंचायत अधिकारी प्रतापरावजी बोदळे यांच्याकडे उताऱ्याची मागणी केल्यानंतर 8 जुलै 2026 रोजी दिगंबर प्रभाकर पाटील यांच्या एकट्याच नावाचा उतारा देण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतर 23 जुलै 2026 रोजी पुन्हा काढलेल्या उताऱ्यात हेमराज प्रभाकर पाटील आणि दिगंबर प्रभाकर पाटील या दोघांची नावे असल्याचे दिसून आले. अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत एकाच मालमत्तेचे दोन वेगवेगळे उतारे कसे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    या संपूर्ण प्रकरणात शासनाची तसेच स्वतःची फसवणूक झाल्याचा आरोप करत हेमराज पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच शिपाई पदावर असताना लिपिक म्हणून सही कशी करण्यात आली, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयातील अशा प्रकारची आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून फेरफार झालेल्या घरउताऱ्यांची पडताळणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026

    देवझिरी-देवगडच्या जंगलात अवैध गांजाची १७५ झाडे जप्त

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif