Live लोकसभा निवडणूक २०१९ : गिरीश महाजनांनी सहकुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

0

जळगाव : सतराव्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला देशभर सुरुवात झाली असून राज्यातील १४ तर देशभरातील ११५ जागांवर मतदान होत आहे. जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदार संघात आज सकाळी ७ वाजेपासून जिल्हयातील एकूण 3 हजार 200 मतदान केंद्रावर मतदान सुरु असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. जळगाव मतदार संघातून 14 तर रावेरमधून 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हयातील 26 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

  • विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम परिवारासह मतदान केल्यानंतर त्यांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही

  • जामनेर येथे पंचायत समिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे व डॉ.पल्लवी सोनवणे यांनी मतदानाचा हक्क बजावला

  • लोकशाही प्रतिनिधी भरत पाटील व संगिता पाटील यांनी सावखेडे खुर्द येथे मतदानाचा हक्क बजावला.

  • भुसावळ :- येथील नगरसेविका पुष्पाताई जगन सोनवणे (वरणगाव माज़ी प.स.सदस्या )व कामगार नेते,प्रदेश महामंत्री पीआरपी जगन सोनवणे यांनी मतदान केले

  • भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांची पत्नी आमदार स्मिता वाघ यांनी मतदान केले. यावेळी ग्रामस्थानीही मतदानाचा हक्क बजावला.

  • रावेर लोकसभा मतदारसंघातील जामनेर पंचायत समितीच्या सभापती निता कमलाकर पाटील यांनी तालुक्यातील पाळधी येथील मतदान केंद्रावर महिलांसोबत रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.

  • गिरीश महाजनांनी सहकुटुंबासह बजावला मतदान
    जामनेर : येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंबासह मतदान केले. जळगाव, रावेरच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

  • उद्योजक किशोर ढाके सपत्नीक यांनी केले मतदान

  • क्रेझी मंगल कार्यालयाच्या मागील संतसंग भवन गणपती नगर येथील मतदान केंद्रावर डॉ. ढाकणे यांनी मतदान केले.

  • खडसे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क
    मुक्ताईनगर :- रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार विद्यमान खासदार रक्षा खडसे सह माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मंदाताई खडसे, रोहिणी खडसे यांच्यासह आदि ग्रामस्थांनी मतदान केंद्रावर मतदान केले.

  • माजी विधानपरिषद सदस्य डॉ.गुरुमुख जगवानी यांनी मतदानाचा हक्क बजावला

  • राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मतदान करण्यासाठी चक्क रिक्षातून मतदान केंद्रावर पोहचले. आज सकाळी पाळधी येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बाजावला.

  • जळगाव लोकसभेचे भाजप-सेना महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी आपल्या मूळ गावी दरेगाव येथे मतदान केले. यावेळी त्यांचे वडील भैय्यासाहेब पाटील, त्यांच्या पत्नी संपदा पाटील व परिवारातील सदस्य उपस्थित होते.

रावेर लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी विवरा येथे कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला….

  • शहरातील मनपा शाळा १७ मध्ये मतदानाचा हक्क बजावतांना दैनिक लोकशाही समूहाचे संचालक राजेश यावलकर सह सपत्नीक व निलेश वाणी ...

  • भालोद तालुका यावल येथे माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे सपत्नीक यांनी बजावला मतदानाचा हक्क. दरम्यान मतदान करून बाहेर येताना….

  • यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर येताना माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील..

  • यावल येथील बालसंस्कार विद्यामंदिरातील मतदान केंद्रात मतदान करून बाहेर येताना माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे

 

यावलमध्ये मतदान सुरू होण्याआधीच ईव्हीएम मशीन सुमारे एक तास बंद

  • यावल येथील बालसंस्कार विद्या मंदिरातील मतदान केंद्रात मतदान सुरू होण्याआधीच ईव्हीएम मशीन सुमारे एक तास बंद पडल्याने मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले दुसरे ईव्हीएम मशीन आले त्यानंतर मतदान सुरू झाले.

 

  • भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव विधानसभा क्षेत्रातील नुतन मराठा महाविद्यालयातील सखी मतदान केंद्रावर मतदारांचे औक्षण करून स्वागत करताना सखी कर्मचारी
  •  फैजपुरला सकाळ पासून मतदारांच्या रांगा अपंग बांधवांनी बजावला आपला मतदानाचा हक्क
  • सुलभ निवडणूक हे ब्रीद घेऊन निवडणूक आयोगाने यावर्षी दिव्यांग मतदारांना विशेष व्यक्तींच्या दर्जा दिला असून त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या आहेत.
  • सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया शांततेत
    सुरूवात झाली असून
    मतदान प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मॉकपॉल घेण्यात आले. त्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी ७.३० वाजता जळगाव शहराच्या प्रथम
    नागरिक महापौर सीमा भोळे आणि आमदार
    राजूमामा भोळे यांनी प्रताप नगरातील महाराणा
    प्रताप शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.
  • माजी मंत्री सुरेशदादा जैन व सपत्नीकसह त्यांचा मुलगा राजेश जैन यांनी सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल भागातील मतदान केंद्रावर मतदान केले. जळगाव शहरातील सर्वच भागात सकाळी उन्हाचा पारा वाढण्याच्या आत नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला..

  • दिलीप चौबे सपत्नीक यांनी बजावला मतदानाचा हक्क.

Leave A Reply

Your email address will not be published.