नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपाने जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज उपस्थित.
जाहीरनाम्यातून भाजपा मोठ्या घोषणा जाहीर करु शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाच वर्षात मोदी सरकारने मिळवलेलं यश तसंच शेतकरी, व्यापारी, तरुण आणि रोजगारासंबंधी काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. जाहीरनाम्यातून भाजपा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, शेतकरी कल्याण, तरुण तसंच महिला सशक्तीकरणावर जास्त भर दिला जाईल. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु कऱण्यासाठी भाजपाला मोठ्या प्रमाणात सल्ले मिळाले आहेत.
*जाहीरनाम्यातील काही महत्वाच्या घोषणा*
२०२२ मध्ये ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आम्ही ७५ संकल्प मांडणार आहोत. २०२२ मध्ये हे सर्व संकल्प पूर्ण कऱण्याच आमचा प्रयत्न असणार आहे – अमित शाह