Live : नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरूवात

0

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. दरम्यान, आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आज सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहे.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन झालं. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे आता निश्चित झालं आहे. दरम्यान, नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून उद्या 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.40 वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

लाईव्ह अपडेट…..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राजभवनाकडे रवाना झाले आहेत. उद्या संध्याकाळी शीवतीर्थावर ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी आज ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले आहेत.

>> काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आमदारकीची शपथ घेतली

>> हरीभाऊ बागडे यांनी आमदारकीची शपथ घेतली

>> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली

>> जयंत पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली

>> पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली शपथ

>> भास्कर जाधव यांनी घेतली आमदारकीची शपथ

>> राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली आमदारकीची शपथ

>> माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आमदारकीची शपथ

>> माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आमदारकीची शपथ

>> विधीमंडळात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात

>> सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची गळाभेट

Leave A Reply

Your email address will not be published.