Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी तुम्ही वाचली का?
    राजकारण

    राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी तुम्ही वाचली का?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 19, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    काल राज्यात पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली. यात  जळगाव जिल्हाच्या पालकमंत्रीपदी पुन्हा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांना नियुक्त करण्यात आलेली आहे. यामुळे आता पाच वर्षांपेक्षा पुढील कालावधीत देखील गुलाबराव पाटील यांच्याकडेच जळगाव जिल्ह्याची धुरा असेल हे आता स्पष्ट झालेले आहे. दरम्यान जिल्ह्यातील मातब्बर नेते तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आलेली आहे. तर ना. संजय सावकारे यांच्याकडे भंडारा जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आली आहे.

    ना. गुलाबराव पाटील यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये पालकमंत्री पद भूषवले होते. आता या मंत्रिमंडळात त्यांना आधीचेच पाणी पुरवठा व स्वछता हे खाते मिळाले असून सोबत जळगावचेच पालकमंत्री पद मिळायची बाब लक्षणीय मानली जात आहे.

    दरम्यान बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र बीडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं असून, बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत. बीड सोबतच अजित पवार यांच्याकडे पुण्याचं देखील पालकमंत्रीपद असणार आहे. यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.

    या राज्याचे हे पालकमंत्री..

    • गडचिरोली – देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्रीआशिष जयस्वाल
    • नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
    • अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे
    • ठाणे – एकनाथ शिंदे
    • मुंबई शहर- एकनाथ शिंदे
    • पुणे – अजित पवार
    • बीड – अजित पवार
    • सिंधुदुर्ग- नितेश राणे
    • अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
    • अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
    • वाशिम – हसन मुश्रीफ
    • सांगली – चंद्रकांत पाटील
    • सातारा -शंभुराजे देसाई
    • छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
    • जळगाव – गुलाबराव पाटील
    • यवतमाळ – संजय राठोड
    • कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ
    • अकोला – आकाश फुंडकर
    • भंडारा – संजय सावकारे
    • बुलढाणा – मकरंद जाधव
    • चंद्रपूर – अशोक ऊईके
    • धाराशीव – प्रताप सरनाईक
    • धुळे – जयकुमार रावल
    • गोंदिया – बाबासाहेब पाटील
    • हिंगोली – नरहरी झिरवळ
    • लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
    • मुंबई शहर – एकनाथ शिंदे
    • मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा
    • नांदेड – अतुल सावे
    • नंदुरबार – माणिकराव कोकाटे
    • नाशिक – गिरीष महाजन
    • पालघर – गणेश नाईक
    • परभणी – मेघना बोर्डीकर
    • रायगड – अदिती तटकरे
    • सिंधुदुर्ग- नितेश राणे
    • रत्नागिरी – उदय सामंत
    • सोलापूर – जयकुमार गोरे
    • वर्धा – पंकज भोयर
    • जालना – पंकजा मुंडे

    #maharashtra Beed Bhandara Dhananjay Munde girish mahajan Guardian Minister Gulabrao Patil jalgaon Nashik Sanjay Savkare
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!

    May 11, 2026

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif