लोकशाही न्यूज नेटवर्क

मनोरंजन विश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावावर जीवघेणा हल्ला झाला असून भावाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच भाऊ रुग्णालयात दाखल आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या भावावर बिहारमधील गोपालगंज येथे हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
वृत्तानुसार, अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा भाऊ बिजेंद्र नाथ तिवारी यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. ही घटना गोपालगंज, बिहार येथे घडली. बिजेंद्र नाथ तिवारी यांना उपचारांसाठी पाटण्याला हलवण्यात आले आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे म्हटले आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीसांचे पथक हल्लेखोरांना पकडण्यासाठी छापेही टाकत आहे. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
बिजेंद्र नाथ तिवारी यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पाटणा येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. पंकज त्रिपाठी यांच्या भावाची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आरोपींची ओळख पटवत आहेत. पोलिसांनी पंकज त्रिपाठी यांचे कुटुंबीय आणि जवळपास राहणाऱ्या रहिवाशांचीही चौकशी केली आहे.
दरम्यान या प्राणघातक हल्ल्यामागील खरे कारण तपासानंतरच समोर येईल. शेअर केलेल्या व्हिडीओत, डॉक्टर रुग्णालयात बिजेंद्र नाथ तिवारी यांच्यावर उपचार करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ गोपालगंज मॉडल हॉस्पिटलमधील आहे. रुग्णालयात लोकांची गर्दीही दिसत आहे.


