Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्ह्यात एकत्र कार्य करू या!
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात एकत्र कार्य करू या!

    श्रीकांत धिवरे यांचे जनतेला आवाहन : डॉ. महेश्वर रेड्डी यांना निरोप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 23, 2026No Comments94 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्हा पोलीस दलात नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निरोप देत नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे स्वागत करण्यात आले. दोन वर्षांच्या कार्यकाळात डॉ. रेड्डी यांनी केलेल्या कामगिरीचा गौरव करत नव्या नेतृत्वाकडूनही प्रभावी आणि जनसहभागातून कामकाजाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

    जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना निरोप आणि नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा स्वागत सोहळा दि.22 रोजी नियोजन भवनात पार पडला. प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी रोहन घुगे, मावळते पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, नूतन अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे म्हणाले की, जिल्ह्यात डॉ. रेड्डी यांची 26 महिन्यांची कारकीर्द सर्वांनी पाहिली आहे. त्यात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

    सीडीडब्ल्यू ॲपमध्ये 12 हजार गुन्हेगारांची माहिती साठवली. इ बिट सिस्टीम राबवली. नागरिकांना घरबसल्या तक्रार करता यावी यासाठी क्यूआर कोड देण्यात आला. एकता चषकाचे आयोजन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या 100 दिवस कलमी कार्यक्रमात राज्यात जळगावने तृतीय क्रमांक पटकावला. पोलीस अधीक्षक कार्यालय, ठाणे अंमलदार कक्ष, पोलीस हॉल, व्यायाम शाळा आणि जलतरण तलाव दुरुस्ती यासारख्या अनेक महत्वाच्या सुधारणा त्यांनी केल्या, असल्याचे गणापुरे यांनी सांगितले.

    नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आजवर 21 वर्ष सेवा बजावली आहे. त्यांनी गडचिरोली चांदूरबाजार येथून सुरुवात केली. धुळे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी उत्तम काम केले. मॅरेथॉन स्पर्धा राबवली. जळगाव जिल्ह्यात देखील असेच कार्य सुरू राहणार असल्याच्या शुभेच्छा गणापुरे यांनी दिल्या.

    प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष करीम सालार, हरिश्चंद्र सोनवणे, कानळदा सरपंच पुंडलीक सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते अयाज अली, इंडियन रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, पत्रकार किशोर पाटील, पोलीस कर्मचारी रतन गिते, सुनील दामोदर, कार्यालयीन कर्मचारी सुरेश ठाकूर, मुकेश सोनवणे, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक योगिता नारखेडे, कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमित माळी यांनी केले. आभार प्रदर्शन एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले.

    अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर म्हणाल्या की, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी सर आणि मी 3 दिवसांच्या अंतराने जिल्ह्यात हजर झालो. 2 वर्षाच्या काळात सर्व काळ कसा गेला ते कळलेच नाही. सेनापती खंबीर असेल तर कोणताही अनुचित प्रकार मोठा असतो असे वाटत नाही. तुम्ही इतके संयमी आणि चांगले आहेत की त्यामुळे माझे अधिकारी मला खडूस म्हणतात. कायदा व सुव्यवस्थेचे अनेक प्रसंग आले मात्र डॉ. रेड्डी यांनी आधार देत सर्व योग्य पद्धतीने हाताळले. आयुष्यात जेव्हाही डोके शांत ठेवून निर्णय घ्यावा लागेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पुढे येऊन सामोरे जावे लागेल तेव्हा तुमची आठवण येईल, असे नेरकर यांनी डॉ. रेड्डी यांच्याबद्दल म्हटले.

    नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी, मला पोलीस दलात 22 वर्ष झाले. मी मुळचा पुणे जिल्ह्यातील आहे. कोणताही गुन्हा असो किंवा गुन्हेगारी असो पोलीस एकटे काही करू शकत नाही जनतेच्या सहकार्याची गरज भासते. आपण जिल्ह्यात एकत्र कार्य करूया असे आवाहन त्यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif