Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»आता कल्याणमध्ये वाढली बिबट्याची दहशत
    महाराष्ट्र

    आता कल्याणमध्ये वाढली बिबट्याची दहशत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 13, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. ग्रामीण भागांनंतर आता कल्याण सारख्या गजबजलेल्या तालुक्यातील ग्रामीण भागत बिबट्याची दहशत असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामीण भागातील रोहण – वाहोली परिसरात बिबट्याचा संचार सुरु असून या बिबट्यामुळे परिसरातील कुत्र्यांवर वारंवार हल्ले होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण तालुक्यातील रोहण – वाहोली परिसरात बिबट्याचा संचार सुरू झाला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरापासून रोहण- वाहोली गाव परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून, त्याने परिसरातील अनेक वेळा कुत्रे आणि जनावरांवर हल्ला केला आहे.

    या घटनेनंतर वनविभाग आणि प्राणीमित्र पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. परिसरात पिंजरे लावण्यात आले असून, तज्ञ अधिकारी आणि स्थानिक ग्रामसुरक्षा समिती एकत्रितपणे हालचालीवर लक्ष ठेवत आहेत. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने काही सूचना दिल्या असून, एकटे बाहेर न पडणे, लहान मुलांना एकटे न ठेवणे, हातात काठी ठेवणे आणि मोबाईलवर गाणी वाजवत हालचाल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

    बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण रोहण-वाहोली परिसरात वनविभाग आणि ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यभरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून बऱ्याच ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत तर काही जण मृत्युमुखी पडले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif