Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; 40 घरांमध्ये पाणी
    ताज्या बातम्या

    ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; 40 घरांमध्ये पाणी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 1, 2026No Comments129 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महसूल प्रशासनाची धाव : जीवितहानी टळली

    जळगाव – तालुक्यातील ममुराबाद येथे मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला मोठा पूर आला. परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने पुराचे पाणी गावातील सुमारे 40 घरांमध्ये शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
    घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पूरग्रस्त घरांमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. पूरग्रस्त भागात महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार मदत व बचावकार्य सुरू असून प्रभावित कुटुंबांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif