‘महिला शक्तीचा उदय’ या विषयावर भुसावळात व्याख्यान

ज्येष्ठ नागरिक संघाची बैठक : मान्यवरांची उपस्थिती

0

 

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

य गणेश मंदिर सुरभी नगर भुसावळ येथे जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा पार पडली. या सभेत प्रमुख वक्ते संघांचे अध्यक्ष राजेंद्र बावस्कर यांचे ‘महिला शक्तीचा उदय’ या विषयावर व्याख्यान झाले.

याप्रसंगी प्रथम श्री राजेंद्र बावस्कर यांच्या हस्ते श्री.गणेशाला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. स्व. मांडाळकर सरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुधा खराटे होत्या. प्रसंगी राजेंद्र बावस्कर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सुविचार वाचन अशोक पाटील यांनी तर सुरेश पाचपांडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. राजेंद्र बावस्कर यांनी महिला शक्तीचा उदय या ज्वलंत विषयावर मार्गदर्शन केले. निआंडरस्टॉल, क्रोमॅग्नानंस हे प्रगत मानवाचे पूर्वज त्यांचा जीवन संघर्ष इसवी सन पूर्व 40000 ते इसवी सन पूर्व 20000 या कालखंडातील आहे ते संवाद साधण्यास साधने तयार करण्यास सक्षम होते.

वंश शास्त्र हा मनुपेक्षा प्राचीन ग्रंथ आहे. ऋग्वेदाच्या 10 मध्ये ब्रह्मवदिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला विद्वानांसाठी मान्यताप्राप्त काही स्त्रोते आहेत. पुरुषांना आपल्या कौशल्याने आणि बुद्धीने पराभूत करू शकणाऱ्या अनेक विद्वान स्त्रिया होत्या. यामध्ये गार्गी, अहिल्या, मैत्रेयी, लोपमुद्रा ,घोष हेमवती उमा यांचा समावेश होतो. त्याप्रमाणे हा वेद धर्म स्त्री लिंगाबद्दल आदर व्यक्त करतो. स्त्रीत्व हे सर्व विश्वातील सर्वोच्च तत्व आहे. मनुस्मुती यात महिलाबद्दल अध्याय 8 व 9 मधील विविध श्लोक मधील संदर्भ देताना भार्या, पुत्र व दास हे धनशून्य असतात. त्यांचे धन हे मालकाचे असते असेही त्यांनी सांगितले.

सुधा खराटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संघाचे सचिव ज्ञानदेव इंगळे यांनी तर विद्या रामवंशी यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.