office christmas gifts under gift wrapping designs for birthday 121 personal gifts kaikini coupon code walmart smart style coupons
Thursday, December 1, 2022

पक्ष सोडला कि माणुसकी…? शिवसैनिकांचा सवाल…!

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

नुकतेच राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे गट तयार झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व सेना आमदार सहभागी झाले आहेत. शिवसेनेतील पदाधिकारी देखील हळूहळू शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे गटाला पाठिंबा देतांना दिसत आहेत. राज्याप्रमाणे आज शहरात देखील शिवसेनेत फुट पडून, युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले. दरम्यान जळगाव महानगर शिवसेनेसाठी तत्कालीन पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील पाटील यांनी डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनची रुग्णवाहिका दिली होती. सत्तांतर होताच पालकमंत्र्यांच्या गटाकडून महानगर शिवसेनेला दिलेली रुग्णवाहिका पुन्हा परत मागून घेण्यात आली आहे. या अमानुष कृत्यामुळे सर्वत्र नाराजीचा एकच सूर उमटत आहे.

- Advertisement -

जळगाव वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवेत असलेल्या रुग्णवाहीकेवरील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आ.संजय सावंत, आ.गुलाबराव पाटील यांचे असलेले स्टिकर्स देखील काढून घेण्यात आले आहे. रुग्ण सेवा आणि आरोग्य सेवेपेक्षा राजकारण अग्रस्थानी असल्याचे यावेळी दिसून आले. हा जाल्गाव्कारांसाठी अत्यंत दुर्दैवी क्षण असल्याचे यावेळी शिवसैनिकांनी म्हटले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या