Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»लक्ष्मीनगरचा राजा मंडळाचा समाजसेवेचा विडा!
    ताज्या बातम्या

    लक्ष्मीनगरचा राजा मंडळाचा समाजसेवेचा विडा!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 3, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    धानोरा, ता. चोपडा

    सामाजिक उत्तरदायित्वाची जाण ठेवत येथील लक्ष्मीनगरचा राजा मंडळाच्या वतीने आयोजित नेत्र व बहुविध आजार तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद लाभला. धानोऱ्यात पार पडलेल्या या शिबिरात 500 हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करण्यात आली.

    या उपक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य गजानन कोळी, व्यापारी अलोक अग्रवाल यांच्या हस्ते झाले. शिबिरात कांताई नेत्रालय, जळगाव आणि धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कवडीवाले, डॉ. जाकीर शेखर, चेतन वाणी, अभिमन्यू पाटील तसेच आशा वर्कर्स यांचा सक्रिय सहभाग होता. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण ठाकूर, उपाध्यक्ष भूषण सपकाळे, खजिनदार कल्पेश सपकाळे, सचिव प्रशांत चौधरी, तसेच इतर कार्यकर्तेही उपस्थित होते. मंडळाचे हे पहिलेच वर्ष असूनही आरोग्य शिबिराच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम हाती घेतल्याने लक्ष्मीनगरचा राजा मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    गणपती बाप्पाला निरोप

    दरवर्षाप्रमाणे येथे श्रींना पाचव्या दिवशी मोठ्या उत्साहात भावपूर्ण निरोप देण्यात आला. गावातील सात मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. ढोल-तोश्यांच्या गगरात गुलालाची उधळण करीत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व त्यांच्या सहकार्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

    October 3, 2026

    कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!

    October 3, 2026

    ‌‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ आता ऑनलाइन!

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif