लातूर नगर पंचायत काँग्रेस दोन ,भाजप आणि महाविकास आघाडीचे एका ठिकाणी वर्चस्व

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

लातूर : भाजप आणि महाविकास आघाडीचे एका ठिकाणी वर्चस्व.  जिल्ह्यातील चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर अनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी बुधवारी पार पडली. यात कॉंग्रेसने दोन ठिकाणी, भाजप आणि महाविकास आघाडीने एका ठिकाणी वर्चस्व मिळवले आहे.

आतापर्यंतचे निकाल खालील प्रमाणे :

चाकूर नगरपंचायत 17 जागांपैकी  महाविकास आघाडीला 8, प्रहारला 6 तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत.

शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप 9, राष्ट्रवादी 4, शिवसेना 3 आणि एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

जळकोट नगरपंचायतीच्या निवडणुकीत

काँग्रेस 7, राष्ट्रवादी 4, शिवसेना 2, भाजपा 1 आणि अपक्ष 3 विजयी झाले आहेत.

देवणी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस 12, राष्ट्रवादी 2, अपक्ष 2, भाजप 1 जागांवर विजयी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.