“दारू औषधाचं काम करते आणि.. “: भाजपा खा. प्रज्ञा सिंह (व्हिडीओ)

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कधी नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हटल्याचं वक्तव्य, तर कधी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्यावरील आक्षेपार्ह विधान यामुळे प्रज्ञा सिंह चर्चेत राहिल्यात. तर आता नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दारू औषधी असल्याचं प्रज्ञा सिंह म्हणाल्या आहेत.

प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, “दारू स्वस्त असो किंवा महाग, दारू औषधाचं काम करते. आयुर्वेदात दारू म्हणजेच अल्कोहोलचा मर्यादित वापर औषधी असतो आणि अमर्याद स्वरुपात ते विष असतं, हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. दारू अधिक घेतल्याने नुकसान होतं हे समजून घेत बंद केली पाहिजे.”

https://twitter.com/PravinSindhu/status/1484383934113021952?s=20

मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान सरकारने नवं आबकारी धोरण आणलं आहे. ते १ एप्रिल २०२२ पासून लागू होणार आहे. यानुसार मध्य प्रदेशमध्ये दारू स्वस्त होणार आहे. यावरच पत्रकारांनी प्रश्न विचारला असता भाजपा खासदार प्रज्ञा सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

प्रज्ञा सिंह या अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत राहतात. याआधीही त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. यात कधी नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हटल्याचं वक्तव्य, तर कधी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांना श्राप दिल्याचं म्हणत केलेली आक्षेपार्ह टीका याचा समावेश आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या होत्या, “चला करोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. आजपासून २५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचं पठण करावं. ५ ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.