Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»कार्यक्रमाला ऐनवेळी अनुपस्थिती : ज्येष्ठ अभिनेत्रीला झटका
    महाराष्ट्र

    कार्यक्रमाला ऐनवेळी अनुपस्थिती : ज्येष्ठ अभिनेत्रीला झटका

    नाशिक जिल्हा ग्राहक आयोगाने ठोठावला लाखोंचा दंड
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 9, 2026No Comments350 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कार्यक्रमासाठी सर्व सुविधा आणि मानधन देऊनही ऐनवेळी उपस्थित न राहिल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मोठा दणका दिला आहे. आयोगाने त्यांना तीन लाख रुपयांचे मानधन तसेच नऊ टक्के वार्षिक व्याजासह भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

    नाशिकच्या सेवानिवृत्त शासकीय अधिकारी डॉ. अरुणा वानखेडे वय वर्ष ७४ यांनी यासंदर्भात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, १८ नोव्हेंबर २०२३ रोजी गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये सहकाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मौसमी चॅटर्जी यांना आमंत्रित करण्यात आले होते.

    तीन लाख रुपयांच्या मानधनावर घेऊन त्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होत्या. त्यानुसार दोन लाख रुपये आरटीजीएसद्वारे देण्यात आले, तर उर्वरित एक लाख रुपये गोव्यात पोहोचल्यानंतर रोख स्वरूपात देण्यात आले. याशिवाय अभिनेत्री आणि त्यांच्या सहाय्यकासाठी मुंबई-गोवा विमानप्रवासाची तिकिटे तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली होती.

    १७ नोव्हेंबर रोजी मौसमी चॅटर्जी गोव्यात पोहोचल्या. मात्र, डॉ. वानखेडे त्यांच्या दुखापतीमुळे स्वतः विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत. याच कारणासह काही अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत मौसमी चॅटर्जी यांनी दुसऱ्या दिवशी नियोजित कार्यक्रमाला उपस्थित न राहता मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम रद्द झाल्यानंतर डॉ. वानखेडे यांनी ई-मेलद्वारे वारंवार संपर्क साधून मानधन परत करण्याची मागणी केली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी ॲड. दीप्ती नाशिककर यांच्या माध्यमातून नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif