लासगाव येथून ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा (Pachora) तालुक्यातील लासगाव (Lasgaon) येथून ३० वर्षीय विवाहिता अचानक बेपत्ता (missing) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये (Pachora Police Station) पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पाचोरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लासगाव ता. पाचोरा येथील वैशाली सुनिल बडगुजर (वय ३०) ही विवाहिता २ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते ३ डिसेंबर दुपारी १ वाजेच्या दरम्यान लासगाव येथुन अचानक बेपत्ता झाली आहे.

पती सुनिल बडगुजर यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये पत्नी वैशाली ही बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून वैशाली सुनिल बडगुजर हिचा शोध पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मुकुंद परदेशी घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.