लासगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
लासगाव येथे आज उर्दू हायस्कूल आवारात फूड फेस्टिवल कार्यक्रम मुलांनी स्वयम् स्फुरतीने बनवून प्रदर्शनात आणुन वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ 5-10 रू कींमत ठेवून विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
गावातील पालकांनी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाचे मान्यवर डॉ. हादी देशमुख, सरपंच समाधान पाटील, उपसरपंच वहीद देशमुख, गोपाल पाटील, प्रेमराज पाटील, पांडुरंग पाटील, राजु तायडे, भरत महाजन, रकीब देशमुख,नंदु पाटील, शानदार देशमुख, फारूक शेख, पत्रकार प्रकाश सुर्यवंशी, पत्रकार बाबुलाल पटेल, शाळेचे मुख्याध्यापक शेख इम्रान सर, जाफर सर, उर्दू मराठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व ग्रामस्थ हजर होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक इमरान देशमुख यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले लासगाव उर्दू हायस्कूलमध्ये कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.