dominos pizza online coupons 2012 led waves coupon inkomstenbelasting 2012 aangifteprogramma efudex discount coupon great 15 year anniversary gifts gunther vw buford service coupons
Thursday, December 1, 2022

आदर्श नगरातून चार लॅपटॉप लंपास; गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील आदर्श नगरात एका ठिकाणाहून ६८ हजार रूपये किंमतीचे चार लॅपटॉपची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

केशव अरूण दिवसे (वय २२, रा. दकरखेडा ता. मलकापूर जि. बुलढाणा) हा तरूण शिक्षणासाठी आदर्श नगर, मोहाडी रोड, जळगाव येथे राहत आहे. त्याच्यासोबत त्याचे काही मित्र देखील राहतात. सोमवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते ९.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीत असलेले ६८ हजार रूपये किंमतीचे चार लॅपटॉप चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

- Advertisement -

त्यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली परंतू कुठेही काहीही आढळून आले नाही. याप्रकरणी अखेर त्यांनी बुधवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या