गोरखपूर ;- उत्तर प्रदेशाच्या स्पेशल टास्क फोर्स आणि पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करीत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर रोड येथील बारा बनकी येथून ससून रूग्णालयातून पलायन करणार्या ड्रग्स तस्कर ललित अनिल पाटील याचा भाऊ भूषण अनिल पाटीलआणि साथीदार अभिषेक विलास बलकवडे यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलवकडे याच्या अटकेनंतर अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. ललित पाटील याला पलायन करण्यास कोणी-कोणी मदत केली. त्याला कोणत्या पोलिस कर्मचार्याने ससून जवळील लॉजमध्ये जाण्यास मुभा दिली. ससून रूग्णालयात तो कोणाच्या मदतीने ड्रग्स रॅकेट चालवत होता. यामधील काही प्रश्नांची उत्तरे भूषण पाटील देवू शकतो. त्यामुळे ड्रग्स रॅकेट प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.