नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
भाजपचे वरिष्ठ नेते असलेले लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती बिघडली असून त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. मागच्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. याआधी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
याआधी आडवाणींना ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 3 जुलैला लालकृष्ण आडवाणींना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याआधी 26 जूनला दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलेलं. त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यांची एक छोटीशी सर्जरी झाली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
लालकृष्ण आडवाणी मागच्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच ते घरी असतात, कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. आडवाणी यांना यावर्षी देशातील सर्वोच्च सम्मान ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे ते राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्यांना त्यांच्या घरी जाऊन ‘भारत रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2015 साली त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आडवाणी वाजपेयी सरकारमध्ये उप पंतप्रधान होते, ते देशाचे गृहमंत्री सुद्धा होते.