मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
तुम्ही लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्यातील महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 1500 वरून 2100 रूपये करण्याचा अंजेडा असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीच्या नेत्याने निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे महायुती सरकारकडूनही शब्द पाळण्यासाठी पहिल्याच महिन्यात याबाबत प्रस्ताव मंजूर करण्याची हालचाली सुरु करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. कारण अनेक अपात्र महिला योजनेचा लाभ घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारकडून लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधारकार्डचा वापर झाला आहे का ? याची पडताळणी केली जाणार आहे. खोटे कागदपत्र देत कुणाकडून फसवणूक केली जात नाही ना याची देखील तपासणी केली जाणार आहे. एका रेशनिंग कार्डवर नाव असलेले कोणत्याही दोन महिला योजना लाभ घेता येणार आहे.
मात्र पॅनकार्डधारक तसेच आयकर भरणाऱ्या महिला तसेच जास्त उत्पन्न नोकरदार महिलांना या योजनेतून वगळण्याची शक्यता आहे. तसेच संजय गांधी निराधार यासह अन्य योजनांचा फायदा घेत असतील तर लाडकी बहिण योजना लाभ घेता येणार नाही, अशी देखील आधीची तरतूद आहे, याची देखील पडताळणी केली जाणार आहे.