पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालीय. हे पैसे काढण्यासाठी बँकेत महिलांची तुफान गर्दी झाल्याचे चित्र आहे.
लाडकी बहिणीचे पैसे दि. १४ ऑगस्ट रोजी बँकेत जमा झाल्याने तसेच दि १५ ऑगस्ट रोजी बँकांना सुट्टी असल्याने आज दि १६ रोजी हे पैसे काढण्यासाठी महिलांच्या बँकेच्या बाहेरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तसेच आज पारोळ्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारा विरोधात बंदचे आयोजन करण्यात आल्याने काही प्रमाणात गर्दी कमी होती. मात्र उद्या दि १७ रोजी अजुन ही गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून काही बॅंकानी आजपासूनच याचे नियोजन करण्याचे सांगण्यात आले आहे.