भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क:
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी चित्त्यांच्या आपापसात झालेल्या भांडणात मादी चित्ता दक्षाचा मृत्यू झाला. दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातून आणलेल्या तीन चित्त्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा वर्षीय चित्ता ‘उदय’चाही समावेश असून, त्याचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला होता. यापूर्वी ‘साशा’ या बिबट्याचाही मृत्यू झाला होता.
MP| A female Cheetah Daksha, brought from South Africa has died in Kuno National Park. This is the 3rd death so far: MP Chief Conservator of Forest JS Chauhan pic.twitter.com/dQp5V0f1Ek
— ANI (@ANI) May 9, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, नर चित्ता वायु, फिंडा आणि अग्नी यांची मादी चित्ता दक्षासोबत लढाई झाली होती. यामध्ये दक्षाचा मृत्यू झाला. यापूर्वी 23 एप्रिल रोजी कुनो नॅशनल पार्कमध्ये ‘उदय’ नावाच्या सहा वर्षांच्या चित्ताचा मृत्यू झाला होता.
दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामधून आणलेल्या एकूण 20 चित्त्यांपैकी 3 चित्त्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये साशा या मादी चित्ताचा पहिला मृत्यू झाला. साशा कुनो नॅशनल पार्क हवामानाशी जुळवून घेऊ शकला नाही आणि आजारपणामुळे मरण पावली. आता फक्त 17 चिते उरले आहेत.
कुनो नॅशनल पार्कमधील सूत्रांनी सांगितले की, जूनच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना सुरक्षित बंदिशीतून बाहेर काढून खुल्या जंगलात सोडण्याची तयारी करण्यात आली आहे. मध्य प्रदेश वन्यजीव प्राधिकरण 70 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या चित्ता पुन्हा आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मध्य प्रदेश कुनो नॅशनल पार्कच्या फ्री-रोमिंग भागात आणखी पाच चित्ते सुरक्षितपणे सोडण्याच्या तयारीत आहे.