“ॲग्रीस्टेक” वर कळणार शेतकऱ्यांची “कुंडली”

शेतकऱ्यांना मिळणार आता डिजिटल किसान कार्ड

0

 

धर्माबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ॲग्रीस्टेकची प्रत्यक्ष नोंदणी 26 जानेवारी सुरुवात झाले आहे ‘ॲग्रीस्टेक वर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची ‘कुंडली’च कळणार आहे. विविध शासकीय योजनांच्या लाभांसह कर्ज मिळवण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.

आधार कार्डप्रमाणे आता केंद्र सरकारने ‘अॅग्रिस्टॅक’ शेतकरी ओळख क्रमांक मिळविण्याबाबतची नोंदणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात अंदाजे पाच लाख खातेदार (आठ अ) आहेत. २६ जानेवारीपासून प्रत्यक्ष नोंदणीला सुरुवात झाली आहे. ‘अॅग्रिस्टॅक’वर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची ‘कुंडली’च कळणार आहे. विविध शासकीय योजनांच्या लाभांसह कर्ज मिळवण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. स्थानिक पातळीवर महसूल, कृषी आणि ग्रामविकासच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.

राज्यामध्ये कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने वापर व परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाची ‘अॅग्रिस्टॅक’ योजना राबविण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रामार्फत मदत घेऊन शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करावयाचा आहे. शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प फायद्याचा आहे.

कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला शेतकरी ओळ म्हणजेच ‘फार्मर आयडी’ असे म्हणतात. शेतकरी ओळखपत्रासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्यांच्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा, त्यांच्या नावावर ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे.

अॅग्रिस्टॅक’ काढल्यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळखीशिवाय शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडीमध्ये एकत्र केली जाईल. त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेचा फॉर्म भरताना सोयीस्कर होईल. सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्रे देण्याची गरज पडणार नाही. भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, तर त्यासाठी यापुढे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी आवश्यक असेल. थोडक्यात शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. शेतकरी योजनांमधून कर्जासारख्या सेवेचा लाभघेण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.