Sunday, November 27, 2022

बिग ब्रेकिंग; उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंता यांना गडचिरोली अपर पोलीस अधीक्षकपदी बढती…

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

सोमवारी राज्यातील पोलीस अधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून, त्यात जळगावचे माजी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जळगाव शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंता यांना गडचिरोली अपर पोलीस अधीक्षक पदी बढती मिळाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले डॉ.प्रवीण मुंढे यांची आज अखेर मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदी पदस्थापना करण्यात आली आहे. धुळे येथील अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची नाशिक पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाने सोमवारी पोलीस अधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे जम्बो गॅझेट प्रसिद्ध केले त्यात या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या