ED च्या रडारवर असलेल्या कृषी अधिकाऱ्याचे अपहरण

कोट्यावधी रुपयांच्या फसवणूकचे गुन्हे, ताब्यात घेण्याआधीच..

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

ईडीच्या रडारवर असलेले बोदवड तालुक्याचे कृषी अधिकारी छगन जहागीर पडवी यांना ताब्यात घेण्यासाठी कुर्ल्यातील अधिकारी बोदवड येथे आले असता त्यापूर्वीच त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे दिली आहे.रात्री उशिराने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्याचे कृषी अधिकारी छगन जहागीर पाडवी (वय 57) उजनी रस्त्यावर एका शेतात पीक पाहण्यासाठी जात होते. दोन किलोमीटर अंतर असताना त्यांच्या चारचाकी वाहनाला दुसऱ्या वाहनाने अडवून काही तरुणांनी तालुका कृषी अधिकारी पाडवी यांना त्यांच्या वाहनात बसवून घेऊन गेले तर पडवी यांच्या वाहन चालकाला तेथेच सोडून दिले. वाहन चालक याने थेट कृषी कार्यालय गटात झालेल्या प्रकाराची माहिती दिली. कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठले व झालेला प्रकार सांगितल्यानंतर अपहरण झाल्याचा गुन्हा रात्री 9 वाजता नोंद करण्यात आला.

कुर्ला पोलीस ठाण्याचे कर्मचारी छगन पाडवी यांना ताब्यात घेण्यासाठी बोदवड पोलीस स्टेशन मध्ये आले होते. छगन पाडवी यांच्यावर मुंबई, नवी मुंबई, पुणे, नंदुरबार, बोदवड, आणि इडी (प्रवर्तन निदेशालय) या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. नंदुरबार न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे. अशी माहिती त्यांनी बोदवडचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.