शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्या-या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/ जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते.

शासनाने नुकत्याच 14 डिसेंबर, 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहित केली आहे. या नियमावलीनुसार 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू. क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू. दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावे, व्यवस्थितरित्या भरून संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत 30 जानेवारी, 2023 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे, पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यानी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.