Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»क्रीडा विभागातर्फे झालेल्या स्पर्धेत कान्ह ललित कला केंद्राची विभागीय जिल्हास्तरीय महोत्सवात राज्यस्तरावर निवड…
    जळगाव

    क्रीडा विभागातर्फे झालेल्या स्पर्धेत कान्ह ललित कला केंद्राची विभागीय जिल्हास्तरीय महोत्सवात राज्यस्तरावर निवड…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 8, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    जिल्हा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणेमार्फत जिल्हास्तर युवा महोत्सवात के.सी.ई. सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्राने 6 डिसेंबर रोजी नाशिक येथील विभागीय महोत्सवात 9 बक्षिसांसह विजेतेपद पटकावले असून आता त्यांची पुणे येथे राज्यस्तरावर निवड झाली आहे. कान्ह ललित कला केंद्र आता नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याने के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    दरवर्षी जिल्हा क्रीडा विभागातर्फे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या संकल्पना आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश केलेले आहेत. युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी युवा महोत्सवासाठी नियम व सूचना आधारित निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी यासंदर्भात युवा महोत्सव घेण्याचे सूचित केले होते. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली होती. त्यावर हा नाशिक येथील विभागीय महोत्सव पार पडला. यात आता कान्ह ललित कला केंद्राने बाजी मारली असून पुढील 20 डिसेंबर रोजी होणार्‍या राज्यस्तरीयसाठी चमू सज्ज झाला आहे. विद्यार्थ्यांना प्रा. मिलन भामरे, प्रा. पीयूष बडगुजर, दिनेश माळी, अजय शिंदे, प्रा. देवेंद्र गुरव, प्रसाद कासार, प्रा. कपिल शिंगाने आणि प्रा. वैभव मावळे यांनी मार्गदर्शन केले.

    या कलाप्रकारात मिळाली बक्षिसे

    एकांकिका – प्रथम, समूह नृत्य – प्रथम, रांगोळी – प्रथम, पोस्टर- प्रथम आणि द्वितीय, समूह लोकगीत गायन – तृतीय, लोकनृत्य (एकल) – द्वितीय,  फोटोग्राफी – द्वितीय.

    विद्यार्थ्यांचे कौतुक

    कान्ह ललित कला केंद्र हे नेहमी विद्यार्थ्यांना कंेंंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी कार्य करत असते. एक समन्वयक म्हणून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक जेवढे करावे, ते कमीच आहे. यापुढेही ही कामगिरी अशीच राहणार यात शंका नाही.

    शशिकांत वडोदकर, के.सी.ई.सोसायटी, सांस्कृतिक समन्वयक

    राष्ट्रीय स्तर गाठण्याचा मानस

    विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर मिळवलेल्या यशाने भारावून न जाता राज्यस्तरावर नाशिक विभागाचा आणि कान्ह ललित कला केंद्राचा डंका कसा गाजवता येईल, याची रणनीती सुरू आहे. शासनाचा हा स्तुत्य उपक्रम असून राष्ट्रीय स्तर गाठण्याचा मानस आहे.

    प्रा. प्रसाद देसाई, कान्ह ललित कला केंद्र, संचालक

    #drama Folk Dance jalgaon Jilha Krida
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    August 16, 2026

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif