Sunday, May 29, 2022

Konkan Floods: नऊ लाखांची रोकड घेऊन डेपो मॅनेजर 9 तास एसटीच्या टपावर

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

अतिमुसळधार पावसाने  राज्यात लावलेली जोरदार हजेरी  काही प्रमाणात ओसरत असला तरी गेल्या आठवडाभरापासून कोकणात पावसाने कसा कहर केला हे दिसून आले. या महापुरात जीवित हानी झाली, कितीतरी लोकांचे आर्थिक नुकसानही झाले. लोकांचे संसार रस्त्यावर आलेत. सध्या कोकण भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर हळूहळू पुराचं पाणीही कमी व्हायला सुरवात झाली आहे. जसजसं पुराचं पाणी ओसरेल तसतशी पुरानंतरची दाहकता समोर येत आहे. अशातच चिपळूणमध्ये धुमाकुळ घातलेल्या पुरातील एक थरारक घटना समोर आली आहे.

- Advertisement -

मागीच्या तीन दिवसापूर्वी चिपळूण एसटी डेपो पुर्ण पाण्याखाली गेला होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे याच पावसाच्या पाण्यात तब्बल 9 तास डेपोतील एसटीच्या टपावर बसून, आगार प्रमुख रणजीत राजेशिर्के यांनी स्वत:च्या जीवासोबत डेपोची रोकड सुद्दा वाचवली आहे. आगार प्रमुख तब्बल 9 लाख रुपये घेऊन 9 तास एसटीच्या छतावर जाऊन बसले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे 7 सहकारी देखील एसटीच्या छतावर जाऊन बसले होते.

रणजीत राजे शिर्के हे चिपळूण आगाराचे आगारप्रमुख आहेत. त्यांनी दोन दिवसापूर्वी चिपळूणमध्ये कोसळलेल्या पावसाची भीषणता माध्यमांना सांगितली आहे. “मी सकाळी पावणेचारच्या दरम्यान डेपोमध्ये आलो. आगारामध्ये सगलीकडे पाणी भरत होते. त्यावेळी फक्त गुडघाभर पाणी होते. सहकाऱ्यांच्या सहाय्याने जे जे वाचवणं शक्य होतं ते ते आम्ही वाचवलं. डेपोमधील कॉम्प्युटर, LCD काढून गाडीमध्ये ठेवली. आमच्याकडे जवळपास 9 लाखा रूपयांची कॅश होती. आम्ही ती पुर्ण कॅश काढून ती गाडीत ठेवली. मात्र पाणी खूप भरत होत, दरम्यान पाण्याचा प्रवाह खूप वाढला आणि आम्हाला बाहेर जाण्याचा रस्ता बंद झाला. आम्ही डेपोतील दोन बसगाड्यांचा आधार घेतला आणि सकाळी साडेपाच वाजल्यापासून मी आणि माझे सात सहकारी मिळून बसच्या टपावर जाऊन बसलो दर मिनिटाला पाण्याची पातळी वाढत होती. जर रोख कार्यालयात ठेवली असती तर ती भिजण्याची आणि वाहून जाण्याची शक्यता होती. आणि त्यासाठी मला जबाबदार धरले गेले असते. म्हणून मी माझ्या जिवाची प्रवा न करता रोख रकमेचे संरक्षण करणे माझे मुख्य कर्तव्य समजले”

आगार प्रमुख रणजीत राजे शिर्के आणि त्यांचे सहकारी पहाटे साडे पाच वाजता एसटीच्या टपावर जाऊन बसले होते. त्यानंतर त्यांनी कलेक्टर ऑफिसशी संपर्क साधून, विभागीय कार्यालयाला वर्तमान परिस्थितीची माहिती दिली. या सगळ्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस डेपोमध्ये आले आणि दुपारी तीन वाजता शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले.

“ही आमच्यासाठी कठीण वेळ होती, आम्ही सरकारी रोख रकमेचे संरक्षक होतो आणि पुराचे पाणी मिनिटाला वाढत होते. आम्ही असा कधी विचार केला नव्हता की आम्हाला असाही दिवस बघायला मिळेल जिथे आम्हाला जीव वाचविण्यासाठी बसच्याच छतावर 9 तास घालवावे लागेल, अशी या पुरजन्य परिस्थितीची थरारक कहानी आगार प्रमुख रणजीत राजे शिर्के यांनी सांगितली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या