Monday, August 15, 2022

भाजपला धक्का.. कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधवांची विजयी वाटचाल !

- Advertisement -

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

कोल्हापूमध्ये भाजपवर महाविकास आघाडी भारी पडली आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये (Kolhapur North By Election Result) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी विजयी वाटचाल केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

कोल्हापूमध्ये आमदार चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. भाजपाने या निवडणुकीत सत्यजित कदम (Satyajit Kadam) यांना उमेदवारी दिली होती. मागील महिनाभरापासून कोल्हापूरात भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू होत्या. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २६ व्या फेरी अखेर ९६ हजार २२६ मतं तर भाजपाचे सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली. जवळपास १८ हजारांहून अधिक मतांनी काँग्रेसचा विजय झाला आहे. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर कोल्हापूरात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. याठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयाचा जल्लोष सुरू केला.

कोल्हापूरच्या जनतेला हा विजय समर्पित

विजयी उमेदवार जयश्री जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत जाधव यांनी विकासाचं जे स्वप्न पाहिलं होते. परंतु दुर्दैवाने नियतीने त्यांचं स्वप्न अर्धवट राहिले. पत्नी म्हणून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे माझं कर्तव्य होते. आज कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. भाजपानं मोठे मन दाखवून पोटनिवडणूक टाळायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. कोल्हापूर पुरोगामी विचारांचा बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिले. महालक्ष्मीची कृपा असल्याने महिला आमदार कोल्हापूरातून निवडून आली आहे. कोल्हापूरच्या जनतेला हा विजय समर्पित आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, असे ते म्हणाल्या.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या