Sunday, May 29, 2022

स्टेटसवरून तरुणांचा राडा; पोलिसांचा लाठीमार

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

कोल्हापूर 

- Advertisement -

सरवडे : स्टेटसवरून तरुणांचा राडा. मुदाळ तालुका भुदरगड येथे आठवी नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्टेटस लावण्याच्या कारणावरून काल, गुरुवारी वादावादी  झाली होती. त्याचे आज दोन्ही गावच्या तरुणांच्यामध्ये राड्याचे स्वरूप झाले. दरम्यान मुरगुड व गारगोटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि वादावर पडदा पडला. या घटनेची नोंद पोलिसात नोंद नाही.

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, एका विद्यार्थ्यांने मुदाळ येथीलच  एकाचा स्टेटस लावला. तर आदमापूर येथील मुलाने आदमापूर येथील स्टेटस लावला. यातून काल या दोघांच्यात फोनवरच शाब्दिक वाद झाला. काल रात्री तरुणांच्यातील हा वाद मिटला होता. मात्र आज सकाळी दहाच्या सुमारास आदमापूर येथील शेकडो तरुण पेट्रोलपंप  मुदाळ तलावपर्यंत जमले तर मुदाळ येथील शेकडो तरुण जमले आणि तरुणाच्यांत हाणामारी सुरु झाली.

हा सर्व प्रकार ग्रामस्थ तसेच रस्त्यावर जाणारी वाहणे थांबवून अनेक प्रवाशी पाहत होते. मात्र नेमके काय झाले काहीच कळत नव्हते. अखेर मुरगुड व गारगोटी येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तरुणांना लाटीमार करुन पांगवले.

काही वेळातच या प्रकाराची बातमी तालुक्यासह जिल्ह्यात पोहोचली. यामुळे विद्यार्थी वर्गात घबराट पसरली. किरकोळ कारणावरुन झालेला वाद तरुणापर्यत पोहोचल्यामुळे वेळीच पोलिस व स्थानिकांनी मध्यस्थी केल्याने मिटला.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या