
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आले असून या प्रकरणी न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावल्याने त्यांचे मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित मानले जात असून त्यांच्या जागी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना संधी दिली जार्इल अशी शक्यता आहे. अनिल पाटील यांच्या रुपाने जिल्ह्यात चौथे मंत्रिपद लाभणार आहे.
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना सुनावलेली शिक्षा वरच्या कोर्टात कायम ठेवण्यात आली आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आल्याने क्रिडा मंत्र्यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. शिक्षा सुनावलेले मंत्री मंत्रिमंडळात राहू शकत नसल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला मोठा झटका बसला आहे. कोकाटे यांच्या जागी माजी मंत्री तथा आमदार अनिल भार्इदास पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. अनिल पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी प्रयत्न केल्याने त्यांना मंत्रिपद बहाल करण्यात येर्इल. महानगरपालिकेच्या आचारसंहितेनंतर हा बदल होणार असल्याचे सांगितले जाते. कोकाटे हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत असल्याने राष्ट्रवादी त्यांना नारळ देर्इल हे जवळपास निश्चित झाले आहे.

