कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शेकापचे व मविआने पाठिंबा दिलेले उमेदवार बाळाराम पाटीलयांना पिछाडीवर टाकले आहे. म्हात्रे यांना २० हजार ६४८ तर पाटील यांना ९ हजार ७६८ मते मिळाली आहेत. म्हात्रे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून या विजयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

यावेळी म्हात्रे म्हणाले की, कोकण मतदारसंघातील शिक्षकांच्या एकजुटीमुळे हा विजय झाला असून सर्वांचे आभार मानतो. तसेच गेल्या ६ वर्षांतल्या कामाची पोचपावती शिक्षकांनी दिली असून मला ३३ संघटनांचा पाठिंबा होता. माझ्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांनी दाखवलेला विश्वास आज सुफळ झाला असून आज हा विजय झाला, असे त्यांनी म्हटले आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये 8 उमेदवार रिंगणात होते. मात्र, येथे खरी लढत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्यात झाली. पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. येथे म्हात्रे यांनी बाजी मारली. इतर उमेदवारांमध्ये धनाजी नानासाहेब पाटील, जनता दल (युनायटेड ), उस्मान इब्राहिम रोहेकर (अपक्ष), तुषार वसंतराव भालेराव (अपक्ष), देवरुखकर रमेश नामदेव (अपक्ष), प्रा.सोनवणे राजेश संभाजी (अपक्ष), संतोष मोतीराम डामसे रिंगणात होते.

Leave A Reply

Your email address will not be published.