Tuesday, November 29, 2022

‘कोई मिल गया’ फेम दिग्गज अभिनेत्याचं निधन

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

बॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद घटना समोर येत आहे. हिंदीतील एक दिग्गज अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं काल रात्रीच्या सुमारास निधन झाल्याचं समोर येत आहे. 3 ऑगस्ट रोजी त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

हृदयरोगाशी झुंज

गेले अनेक दिवस मिथिलेश हृदयरोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने सगळ्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिल्याचं समोर आलं आहे.त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, “तुम्ही जगातले सर्वात सुंदर पिता होतात, तुमचा जावई असूनही मला तुम्ही मुलासारखं प्रेम दिलंत, देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.”  मिथिलेश यांनी अनेक सुपरहिट प्रोजेक्टमध्ये अनेक चांगल्या भूमिका निभावल्या आहेत.

निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा 

कोई मिल गया, गदर एक प्रेमकथा, सत्या, बंटी और बबली, क्रिश, ताल, अशोका, रेडी अशा एकाहून एक सरस कलाकृतींमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. तसंच या अभिनेत्याने बहुचर्चित स्कॅम 1992 या वेबसीरिजमध्ये सुद्धा भूमिका साकारली आहे. त्यांनी स्कॅम या सिरीजमध्ये रॅम जेठमलानी हे पात्र साकारलं होतं. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असल्याचं समजत असून अनेक चाहते त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या