Saturday, November 26, 2022

भुसावळ पुन्हा हादरले; १२ वीच्या विद्यार्थ्यावर चाकु हल्ला…

- Advertisement -

 

- Advertisement -

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरल आहे. पुन्हा भरदिवसा शहरात एका तरुणावर धारदार चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. भुसावळ-जामनेर रोडवरील हिमालया पेट्रोल पंपांसमोर एका महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणावर दुपारी २ वाजेच्या सुमारास चाकु हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

नाहाटा महाविद्यालयात १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेला आदित्य कैलास सावकारे या तरूणावर हिमालया पेट्रोल पंपांसमोर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड त्यांचे सहकारी प्रशांत परदेशी, निलेश चौधरी, तुषार पाटील, मिलिंद कंक, अतुल कुमावत हे घटनास्थळी पोहोचले. जखमी तरुणाला ट्रामा केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीस आपला पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या