क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर आ.किशोर पाटील…

0

 

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क:

विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून पाचोरा – भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. नुकतेच त्यांना याबाबत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव शिवदर्शन साठ्ये यांचे कडील पत्र प्राप्त झाले आहे.

(MLA Kishore Patil has been appointed as a nominated member as a representative of Maharashtra Legislative Assembly on the University)

त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. आपण विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी प्रयत्न करून महाराष्ट्र शासन व विद्यापीठ प्रशासनात उत्तम समन्वयक म्हणून काम करतांना विद्यार्थी वर्गाला न्याय देण्याचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया आ. किशो पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.