किसनराव नजन पाटलांकडेच एलसीबीची धुरा !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाचोरा येथील पोलीस निरिक्षक किसनराव नजन पाटील (Kisanrao Najan-Patil) यांच्याकडे पुन्हा स्थानिक गुन्हा शाखेची (local crime branch) धुरा सोपवण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे (SP Dr. Praveen Munde) यांनी किसनराव नजन पाटील हे एलसीबीचे प्रमुख बनणार असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे.

मराठा समाजाबाबत (Maratha Samaj) केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीमुळे एलसीबीचे प्रमुख किरणकुमार बकाले (Kirankumar Bakale) यांना निलंबीत करण्यात आले आहे. यानंतर अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे हे पद नेमकं कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. दरम्यान गुन्हे शाखेच्या रिक्त पोलीस निरीक्षक पदाचा पदभार तात्पुरता पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.

मात्र पदभार स्विकारल्यानंतर काही तासातच पोलीस अधीक्षकांचे आदेश आयजींकडून रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान आयजींनी अचानक आदेशाला स्थगिती दिल्यामुळे पोलीस दलात अनेक चर्चांना उधान आले होते. मात्र आता या पदावर पुन्हा एकदा पाचोरा येथील पोलीस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.