Tuesday, November 29, 2022

पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांच्याकडे एलसीबीचा पदभार…

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

बाकालेंच्या निलंबनानंतर तत्काळ पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा पदभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी नुकतेच काढले आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक किसन लक्ष्मण नजन, पाचोरा पोलीस ठाणे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचे नियमित नेमणुक आदेश होईपावेतो त्यांची मुळ नेमणुक पाचोरा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी या पदाचे कामकाज सांभाळून पाहतील.

दरम्यान, किसनराव नजन-पाटील हे डॅशिंग अधिकारी म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत. जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर जळगाव शहर, चोपडा आणि नंतर पाचोरा पोलीस स्थानक असा नजन पाटील यांचा कार्यकाळ राहिला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या