किसनराव नजन पाटलांच्या नियुक्तीला आयजीं कडून स्थगिती… पळें कडे सूत्र…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पीआय म्हणून रात्री उशिरा नियुक्ती झालेले पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या नियुक्तीला आयजी बी.जी.शेखर यांनी स्थगिती दिली आहे.

पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे पाचोरा पोलीस ठाण्यासह जळगाव एलसीबीचाही पदभार सोपविण्यात आला होता. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी रात्री काढले होते. परंतू आज दुपारी आयजी बी. जी. शेखर यांनी किसनराव नजन-पाटील यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. तसेच आता एलसीबीची धुरा एपीआय जालिंदर पळे यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.