Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»कृषी»शेतकऱ्यांसाठी दिलासा : किसान क्रेडिट कार्ड योजनेतून ४ टक्के व्याजदराने ५ लाखांपर्यंत कर्ज
    कृषी

    शेतकऱ्यांसाठी दिलासा : किसान क्रेडिट कार्ड योजनेतून ४ टक्के व्याजदराने ५ लाखांपर्यंत कर्ज

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 29, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेतकऱ्यांसाठी दिलासा : किसान क्रेडिट कार्ड योजनेतून ४ टक्के व्याजदराने ५ लाखांपर्यंत कर्ज

    मुबई I लोकशाही न्यूज नेटवर्क

    शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. यामधील महत्त्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना. या योजनेत शेतकऱ्यांना केवळ ४ टक्के व्याजदराने पाच लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्जाचा उपयोग शेतीसाठी लागणारी उपकरणे खरेदी करण्यासोबतच पशुपालन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यपालन यांसारख्या कृषी व्यवसायासाठी करता येतो.

    योजनेचा उद्देश
    सावकारांच्या जाचातून शेतकऱ्यांना मुक्त करून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मागील ११ वर्षांपासून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी ही योजना आधार ठरत आहे. शेतकऱ्यांना दिले जाणारे कार्ड एटीएमसारखे कार्य करते. बँकेने ठरवलेल्या मर्यादेत कधीही पैसे काढता येतात. विशेष म्हणजे व्याज फक्त काढलेल्या रकमेवरच आकारले जाते. साधारण व्याजदर ७ टक्के आहे; मात्र वेळेवर परतफेड केल्यास सरकार ३ टक्के व्याज सवलत देते आणि त्यामुळे प्रभावी व्याजदर फक्त ४ टक्के राहतो.

    गहाण व फीपासून सवलत
    कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज जमीन गहाण न ठेवता मिळते, तर जमिनीच्या हमीवर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. यासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही. तसेच पिक विम्याचे संरक्षण मिळते. कर्जाची मुदत पाच वर्षांची असून दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते.

    आवश्यक कागदपत्रे

    आधार कार्ड

    जमिनीचे कागदपत्र

    बँक पासबुक

    अर्ज प्रक्रिया
    या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी जवळच्या बँक शाखेत जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन किसान क्रेडिट कार्ड पर्याय निवडावा, अर्ज भरून सबमिट करावा. त्यानंतर अर्जाचा संदर्भ क्रमांक मिळतो व पात्र शेतकऱ्यांशी पाच दिवसांत बँकेकडून संपर्क साधला जातो. किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांच्या शेती व संबंधित व्यवसायाला मोठे प्रोत्साहन देत असून त्यांचे आर्थिक स्वावलंबन मजबूत करण्यास महत्त्वाची ठरत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #farmers Kisan Credit Card Scheme
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट

    October 12, 2026

    शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!

    October 12, 2026

    पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif