नॉट रिचेबल सोमय्यांचा व्हिडिओ शेअर ! ठाकरे सरकारला दिला पुन्हा इशारा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात वाद सुरूच आहेत. सेव्ह विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. किरीट सोमय्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करणार आहेत. याप्रकरणी पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत ठाकरे सरकारला पुन्हा इशारा दिला आहे.

या व्हिडिओमध्ये किरीट सोमय्या ठाकरे सरकारला इशारा देत म्हणाले की, ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांवर अंतिम कारवाई होईपर्यंत किरीट सोमय्या झुकणार नाही, मागे हटणार नाही, आम्ही उच्च न्यायालयासमोर सर्व ठेवणार असं किरीट सोमय्या यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे.

2013 मध्ये त्यावेळच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने INS विक्रांत युद्धनौकेला भंगारात 60 करोड रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला. भाजपने या निर्णयाचा निषेध केला. 10 डिसेंबर 2013 ला सेव्ह विक्रांतसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम केला. फक्त हा एकच कार्यक्रम केला होता, यात 11 हजार रुपये जमा झाले.

आता 10 वर्षांनंतर शिवसेना नेता संजय राऊत यांनी सांगितलं की, किरीट सोमय्यांनी 58 कोटींची घोटाळा केला. चार बिल्डरच्या मदतीने मनी लॉन्ड्रींग करुन आपल्या मुलाच्या कंपनीत गुंतवले. पण याआधीही संजय राऊत यांनी सात आरोप केले, एका आरोपाचा पुरावा नाही, मुंबई पोलिासंकडे एक कागद नाहीए, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.