अखेर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले निलंबित

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठा समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एलसीबीचे प्रमुख किरणकुमार बकाले यांना निलंबीत करण्यात आले आहे.

एलसीबीचे प्रमुख निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह व अश्लील भाषा वापरल्याचे ऑडियो क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याप्रकरणी मराठा समाज आक्रमक झाला असून, बकाले यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करावे, या मागणीसाठी समस्त मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले होते.

याप्रकरणाची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी एलसीबीचे प्रमुख निरिक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री उशीरा बदली केली होती. दरम्यान, काल दिवसभरात मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत बकाले यांच्या निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यात आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, विनोद देशमुख यांचाही समावेश होता. याबाबत पोलीस अधीक्षक मुंढे यांना निवेदन देण्यात आले.

यासंदर्भात काल रात्री उशीरा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी किरणकुमार बकाले यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.