साळुंकवाडी येथे कार्यक्रम ; संजीवकुमार देवनाळे यांचे प्रतिपादन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

किनगाव : आजचा युवक हा देशाचा आधारस्तंभ असून युवकांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहावे. चांगल्या गोष्टींची सवय बाळगावी त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य  अबाधित ठेवून उत्तम असे जीवन जगता येते असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित महात्मा फुले महाविद्यालय किनगाव आयोजित पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धन आणि स्वच्छ भारत अभियान करिता विशेष युवक  शिबिरात व्यसनमुक्ती व युवक या विषयावर गुरुवारी व्याख्यानातून  पत्रकार संजीवकुमार देवनाळे यांनी प्रतिपादन केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बळीराम पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शनी मोरे हे उपस्थित होते. पुढे बोलताना देवनाळे म्हणालले की, धूम्रपान, दारू, तंबाखू आणि गांजा हे व्यसनाचे मुख्य चार प्रकार आहेत. तरुणांच्या मनामध्ये व्यसनाबद्दल आकर्षण असते आणि वाईट संगतीच्या सहवासातून नकळतपणे  व्यसनाची सवय जडते . म्हणून तरुणांनी चांगल्याची संगत करावी ,बहुतांश वेळा व्यसनाची सवय ही घरातील  ज्येष्ठांचे अनुकरणातून होत असते.

म्हणून ज्येष्ठ व्यक्तींनी आपल्या मुलांसमोर व्यसन न करता त्यांना चांगले संस्कार कसे देता येतील याचा प्रयत्न करावा व युवकांनी वाईट सवयींचे  अनुकरण न करता चांगल्या सवयींचे अनुकरण करावे व व्यसनापासून दूर राहावे. व्यसनाधीनतेची अनेक वेगवेगळी कारणे असून संपन्नता, हलाकीची परिस्थिती , स्वभाव, दुःख ,निराशा

रेकामटेकडेपणा जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आणि संगत अशी वेगवेगळी कारणे आहेत. या सर्व कारणांवर मात करून युवकांनी निर्व्यसनी राहून उत्तम आरोग्य जगावे.  व्यसन करायचेच असेल तर चांगल्या संस्काराचे, उच्च ध्येयाचे व्यसन करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले . यावेळी  कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. भारत भदाडे यांनी केले तर आभार कृष्णा साळुंखे यांनी मानले .यशस्वीतेसाठी स्वयंसेवकानी स्वयंस्फूर्त सहभाग नोंदविला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.