Sunday, May 29, 2022

गडखांब – दहिवद रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट ठार

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

तालुक्यातील गडखांब ते दहिवद रस्त्यामध्ये दि. 19 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने काळवीट ठार झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

उन्हाची वाढती तीव्रता ही मुक्या प्राण्यांसाठी घातक ठरणारी असते. पाण्याच्या शोधात असलेले वन्यजीव गावाच्या दिशेने किंवा रस्त्याच्या दिशेने फिरत असतात. अशाच भर दुपारच्या उन्हात पाण्याच्या शोधात असलेले एक वयस्क काळवीट गडखांब ते दहिवद रस्त्यामध्ये अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने ठार झाले.

तोंडाला आणि कमरेला जबर मार झाल्याने काळवीट मृत झाले. सदर मृत काळवीट पत्रकार सागर मोरे व स्थानिक नागरिक नजरेस पडले. त्यांनी लागलीच वनपाल पी.जे. सोनवणे यांच्याशी दूरध्वनीने संपर्क साधत माहिती दिली. त्यांनी तात्काळ वन कर्मचारी पाठवत मृत काळवीट ताब्यात घेऊन शव विच्छेदनास नेले. शव विच्छेदन करून मृत काळवीटवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती वनपाल सोनवणे यांनी दिली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या