डिलिव्हरी बॉयनेच चोरले ‘ते’ मोबाईल

ऑनलाइन फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड, निंभोरा पोलिसांचे सर्वत्र कौतुक

0

(खिर्डी) प्रभाकर महाजन, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

तांदलवाडी ता.रावेर येथील रहिवासी सुनील दशरथ पाटील यांनी ऑर्डर केलेल्या मोबाइल बॉक्समध्ये साबण आढळून आल्याची घटना घडली होती. दरम्यान मोबाईल शोधण्यासाठी त्यांनी सर्व बाजुंनी प्रयत्न सुरू केले होते, परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांचा पदरी निराशाच येत होती.

ऑनलाईन मागवला मोबाईल आले साबण

पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घटनेची आपबिती पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांना सांगितली.  त्यानंतर बोचरे यांनी लगेचच गुन्हा दाखल करीत आपले सहकारी सुरेश अढायके, यांच्या सोबत प्रकरणाचा तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासातच गहाड झालेला मोबाईल फोन शोधून काढला.

डिलिव्हरी बॉय रुकेश तुकाराम पाटील रा.कडगाव ता. जि.जळगाव याला तपासासाठी बोलाविले. यावेळी त्याने कबुल केले की मीच मोबाईल खोक्यात साबण भरून दिले होते. खाकी वर्दी दाखवताच त्याने अनेक उलगडे केले.  पोलिसी भाषेत अधिक विचारपूस करता असे आढळून आले की, हा या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा कंपनी किंवा ग्राहकांना फसवणूक करत होता. डिलिव्हरी बॉय रुकेश पाटील यांचे कडून ऑल इन वन टीव्ही, वन प्लस मोबाईल, पुमा शूज, हेडफोन, शावमी मोबाईल, नारझो मोबाईल आदी ५२७४८ रुपये किंमतीच्या वस्तू जप्त करीत त्याला अटक करण्यात आली आहे.

एक साधारण कुटुंबातील व्यक्तीला न्याय मिळाल्याने  त्यांनी व त्यांच्या परिवाराने पोलीस निरीक्षक बोचरे  व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या प्रकरणामुळे पोलिसांची कार्यतत्परता पुन्हा एकदा समोर आली असून फार मोठे ऑनलाइन फसवणुकीचे रॅकेट उघडकिस आले आहे. याप्रकरणी सर्वत्र निंभोरा पोलीसांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.