खिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर तालुक्यातील खिर्डी येथे एक तरुण गावठी कट्टा स्वतः जवळ बाळगत असल्याची गोपनीय माहिती निंभोरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक १८ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास खिर्डी खुर्द शिवारात निळकंठ पुंडलिक बढे यांचे शेत गट क्रमांक ३४९ मध्ये एका घराचे शेजारी एक इसम दहशत माजवण्याच्या इराद्याने अवैधरित्या गावठी पिस्तूल स्वतःच्या कब्जात बाळगून आहे.
यावरून पोलीस उपनिरीक्षक ढाकणे सोबत पोलीस स्टाफसह मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करण्यासाठी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तेथे एक तरुण संशयित हालचाली करताना दिसून आल्याने त्यास रात्री ११:३० वाजता जागीच पकडून त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या अंगझडतीमध्ये दोन गावठी पिस्तूल, (मॅक्झिनसह) मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. अनिल रामलाल बारेला (रा. खिर्डी, ता. रावेर) असे नाव त्याने सांगितले आहे.
त्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून पुढील कारवाई करून गुन्हा नोंद केला आहे. याप्रसंगी निंभोरा पोलिस स्टेशनचे सपोनी हरिदास बोचरे व उपनिरीक्षक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक पोलीस हवालदार योगेश चौधरी, पोलीस नाईक सुरेश पवार, पोलीस शिपाई अमोल वाघ, पोलीस शिपाई सरफराज तडवी, पोलीस शिपाई रशीद तडवी, पोलीस शिपाई, प्रभाकर ढसाळ, पोलिस शिपाई रशिद तडवी यांनी ही कामगिरी केली.

